Sunday, 1 January 2017

कृती कार्यक्रमांची प्रक्रिया


मुलांनी पार पाडलेला कुठलाही कृती कार्यक्रम खालील प्रक्रियेतून गेलेला असावा.
. निरीक्षण
अगदी सुरवातीस मुलांनी परिसरातील प्रश्नाशी / ठरवलेल्या कृतिशी संबंधित घटक उदा. लोक, जागा, घटना, प्रक्रिया . यांचे निरीक्षण केलेले असावे. त्यावर  आपल्या गटात मांडणी केलेली असावी.
. अनुभव
कृतिशी संबंधित घटकांशी मुलांचा जवळून संबंध आलेला अस्व त्यांसोबत त्यांनी कुठल्यातरी प्रकारे संवाद केलेला असावा.
. अभ्यास
निरीक्षण अनुभवातून समोर आलेल्या बाबींचा आदिक अभ्यास मुलांनी स्वत: करावा. त्यासाठी निमंत्रक, शिक्षक, पालक, इंटरनेट, पुस्तके, वृत्तपत्र . ची मदत घ्यावी.
. विचार
अभ्यासानंतरच  गटामध्ये कृती कार्यक्रम ठरवण्यात यावा. कुठल्या प्रकारे कृती पार पाडण्यात यावी, काय काळजी घेण्यात यावी, कृती करण्याचा उत्तम पर्याय काय आहे इ. बाबींवर गटात चर्चा घडावी.
. कृती
विचारांती ठरलेला कृती कार्यक्रम प्रत्यक्ष पार पाडण्यात यावा.
. अनुभवकथन
कृतीतून काय निरीक्षणे झाली यावर गटात चर्चा घ्यावी. त्यानुसार पुढील अभ्यास / कृती ठरवण्यात यावी.


 

No comments:

Post a Comment