Sunday, 1 January 2017

कुमार निर्माण - थोडक्यात


 उद्दिष्ट
शालेय वयोगटातील मुलांसाठी एक अशी आनंददायी शैक्षणिक प्रक्रिया उभी करणे ज्यातून भविष्यात त्यांच्यामध्ये विश्वबंधुत्वाची भावना निर्माण होईल व
· शालेय वयोगटातील मुलांमध्ये ‘वैश्विक मानवी मुल्यांची’ रुजवणूक होईल
· शालेय वयोगटातील मुलांची ‘स्व’ ची व्याप्ती वाढेल
· शालेय वयोगटातील मुलांमध्ये ‘सामाजिक कृतीची प्रवृत्ती’ जोपासण्यास सुरुवात होईल

वैश्विक मानवी मूल्ये
कुमार निर्माण अंतर्गत आपण ज्यावर भर देणार आहोत अशी मूल्ये खालीलप्रमाणे
· न्याय (Justice)
· अनुकंपा (Compassion)
· वैज्ञानिक दृष्टीकोन (Scientific Outlook)
‘स्व’ ची व्याप्ती
 शालेय वयोगटातील मुलांनी स्वत:सोबतच इतरांचाही विचार करावा. इतरांची व्याख्या  सुरुवातीला मुल स्वत:, मुलांचे कुटुंबीय, मित्र, वर्गमित्र यांपासून होऊन परिसरातील लोक, शाळेतील इतर मुले, त्यांचा परिसर . अशी वाढत जावी.
आपल्या कृतींमध्ये स्पर्धेच्या ऐवजी सहकार्याचा विचार करण्यास मुलांनी सुरुवात करावी.

 
सामाजिक कृतीची प्रवृत्ती
मुलांनी सामाजिक कार्य करणे अभिप्रेत नसून मुलांमध्ये सामाजिक उत्तरदायित्वाची भावना तयार होणे, आपल्या आजूबाजूच्या परीसराप्रती आपल्या कर्तव्यांची जाण होणे या भावना लहान लहान कृतीतून व्यक्त होणे हे अपेक्षित आहे.
मार्गदर्शक तत्वे
No comments:

Post a Comment