Sunday, 31 January 2016

कुमार गीत – यापुढे यशाकडे !


यापुढे यशाकडे अखंड झेप घ्यायची ||धृ||
शक्ती-युक्ती बुद्धीने सुजाण यत्न चालवू
संपदा समर्थता उदंड आम्ही मेळवू
सावधान पाऊले जयाप्रतीच जायची ||१||
वज्रता विनम्रता तनुमनात बाणवू
स्न्हेह्शील एकता निज-अंतरात तेववू
वीज वादळातही ज्योत न विझायची ||२||
अजिंक्य झेप अपुली अशक्य शब्द नेणते
मृगेन्द्रता स्वयं ही एवं मंत्र एक जाणते
सार्थ ती करू अशी शपथ ही वाहायची ||३||
विक्रमी कृती करू चला दिगंत हालवू
तेज मायभूमीचे उभ्या जगास दाखवू
चेतना स्वरातली उरात जागवायची ||४||
. – सौजन्य: जागृती गट, डोमरीया गीताची चाल ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

No comments:

Post a Comment