Tuesday, 31 May 2016

कुमार गीत - सृष्टीचे मित्र आम्ही

सृष्टीचे मित्र आम्ही, मित्र अंकुराचे
ओठावर झेलू या थेंब पावसाचे... || धृ ||

अंकुरत्या बीजाला हवा ऊनवारा
मायेची छाया अन् मनाचा उबारा
पाचूचे मखमाली चित्र जीवनाचे
ओठावर झेलू या... || १ ||

लवलवत्या पात्याचे नवे गीत गाऊ
विज्ञाना ममतेचे नवे सुर देऊ
युध्द नको, शांती हवी शब्द अमृताचे
ओठावर झेलू या... || २ ||
(दहावीफ’ या  मराठी चित्रपटातून)No comments:

Post a Comment