Showing posts with label कोडे. Show all posts
Showing posts with label कोडे. Show all posts

Tuesday, 26 June 2018

कोडे


एक अतिश्रीमंत माणूस असतो. त्याने त्याच्या घरी रात्र पाळीसाठी एक वॉचमन ठेवलेला असतो. एकदा त्या अतिश्रीमंत माणसाला कामासाठी परदेशी जायचे असते. त्याने तेवढ्यासाठी विमानाचे तिकीटदेखील काढलेले असते. ज्यादिवशी तो श्रीमंत माणूस प्रवासासाठी निघणार असतो त्यादिवशी सकाळी त्याचा तो वॉचमन येतो आणि त्या माणसाला म्हणतो की तुम्ही आज जाऊ नका. तो माणूस विचारतो की का नको जाऊ. तर हा वॉचमन म्हणतो “मी कालरात्री स्वप्न बघितलं की तुम्ही ज्या विमानाने जाणार आहात त्या विमानाला अपघात होतो आणि सर्वच्या सर्व यात्री मरतात.” हे ऐकून तो श्रीमंत माणूस जायचा बेत रद्द करतो. दुसऱ्या दिवशी त्याला पेपर मध्ये वाचून कळतं की खरच त्या विमानाला अपघात झालेला असतो आणि सर्व प्रवासी मेलेले असतात. तो श्रीमंत माणूस हे ऐकून त्या वॉचमनला बोलावतो, त्याला ५०००/- रुपये बक्षीस देतो आणि कामावरून काढून टाकतो. श्रीमंत माणूस असं का करतो?

Monday, 26 February 2018

कोडे


कोडं
‘अ’ हे भांडे पूर्ण भरले तर त्यात ५ लिटर पाणी मावते. ‘ब’ हे भांडे पूर्ण भरले तर त्यात ३ लिटर पाणी मावते.  ही दोन्ही भांडी रिकामी आहेत.  बादलीत पाणी भरलेले आहे.
‘बादलीत किती लिटर पाणी आहे?’
‘मोजलेले नाही. पण ८ लिटर पेक्षा जास्त आहे. आता ‘अ’ आणि ‘ब’ या भांड्यांत प्रत्येकी एक एक लिटर पाणी काढायचे आहे. तर केवळ बादली आणि ही दोन भांडे याचाच उपयोग करून कसे करता येईल?’
शेवटी ‘अ’ व ‘ब’ भांड्यांत एक एक लिटर पाणी उरले पाहिजे. भांड्यांवर खुणा करावयाच्या  नाहीत.






Thursday, 31 August 2017

कोडं


अ’ आणि ‘ब’ ही दोन भांडी रिकामी असताना समान वजनाची व समान धारकतेची आहेत. ‘अ’ भांड्यात काठोकाठ पाणी भरले आहे. ‘ब’ भांड्यातील पाण्यात एक लाकडी ठोकळा तरंगत आहे. हा लाकडी ठोकळा असताना ‘ब’ मधील पाणीदेखील अगदी काठोकाठ आहे.
ही दोन्ही भांडी तराजूच्या दोन पारड्यात ठेवली आहेत. या स्थितीत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?
. अ’ बाजूचे पारडे खाली जाईल
. ब’ बाजूचे पारडे खाली जाईल

. दोन्ही पारडे संतुलित राहतील


Wednesday, 1 March 2017

कोडे

कोसल देशाची राजकन्या स्मितवदना ही जन्मतः आंधळी होती. आपल्या राजकन्येला दृष्टी यावी यासाठी राजाने अनेक प्रयत्न केले पण यश काही मिळालं नाही.
एकदा एक जटाधारी वृध्द राजवाड्यात आला असता त्याने सांगितले. “राजा, उन्नतग्रीव नावाच्या पर्वताजवळ एक गुहा आहे. त्या गुहेत एकवीस पाकळ्या असलेले व निसर्गतःच सुगंधित असलेले एक सुवर्णकमल आहे . त्या कमलपुष्पातील सुगंधित पाणी राजकन्येच्या डोळ्यात घातले तर तिला पुन्हा दृष्टीलाभ होईल.”
राजाने घोषित केले की जो कोणी ते सुवर्णकमल आणून राजकन्येला पुन्हा दृष्टी मिळवून देईल त्याला अर्धे राज्य देण्यात येईल.
सोमल देशाचा राजकुमार मात्र त्या जटाधारी वृद्धाला जाऊन भेटला आणि मार्ग विचारला. त्यांनी सांगितलं.
“तरूणा, उन्नतग्रीव पर्वतावरील एका गुहेत एक सोन्याची, एक चांदीची व एक तांब्याची अशा तीन पेट्या आहेत त्यातील एक पेटीत ते कमल आहे व उरलेल्या दोन पेट्यांत विषारी साप आहे. जो कोणी त्या दोन पेट्या उघडेल त्याचा मृत्यू अटळ आहे. पेट्या दगडात घट्ट बसवलेल्या आहेत. एक यक्ष या प्रत्येक पेटीवर एक-एक वाक्य लिहून ठेवतो. त्या तीन विधानांपैकी एकमात्र विधान सत्य असते. इतर दोन असत्य असतात आणि त्या विधानांमध्ये कमल कोणत्या पेटीत आहे याबद्दल माहिती असते. यावरून तुला पेटी निश्चित करावी लागेल.”







राजपुत्राला तिथे गेल्यावर पुढील तीन पेट्या दिसल्या. यातील कोणत्या पेटीत सुवर्णकमल आहे हे शोधायला राजपुत्राला मदत करा