Saturday, 31 December 2016

कुमार निर्माण बॉक्स

मुलांनो, आपले कुमार गीत ‘प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा’ तुम्हाला आतापर्यंत पाठ झालं असेलंच आणि तुम्ही ते आवडीने गात असाल. मग गाण्यात म्हटल्याप्रमाने तुम्ही प्रश्न विचारताय की नाही? तुम्हाला पडलेले प्रश्न तुम्ही नक्की निमंत्रकाना, शिक्षकांना, पालकांना किंवा अगदी आम्हाला विचारत राहा. आम्हाला प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नं. या मासिकाच्या सुरवातीस दिलेले आहे. नव्याने कुमार निर्माणसोबत जोडल्या गेलेल्या  मित्रांसाठी या भरारीत पुन्हा एकदाप्रश्न विचारा..’ हे गीत देत आहोत.
असंच मुलांना अजून प्रश्न पडावे आणि मुलांनी ते बिनधास्त विचारावे यासाठी आपल्याच एका पुण्यातील गटाने एक नवीनच भन्नाट आईडिया लढावली व कुमार निर्माण बॉक्स चा जन्म झाला.
यात मुलांना पडलेले कोणतेही प्रश्न, समस्या, दिसलेली घटना, ज्या वरून आपल्याला राग आला अशी एखादी गोष्ट मुलं या बॉक्समध्ये टाकतात आणि मग बैठकीत हा बॉक्स उघडून त्यातल्या प्रश्नांवर तसेच समस्यांवर चर्चा करतात. सगळे मिळून या प्रश्नांवर काहीतरी उपाय शोधतात आणि मग हे प्रश्न कृती करून सोडवतात.
मग तुम्हीही असा एक बॉक्स तुमच्या गटासाठी बनवा त्यात भरपूर प्रश्न जमा करा. मग गटात त्यावर चर्चा करून उपाय शोधण्याचा प्रयत्न आपण करूया. याच बॉक्स मध्ये तुम्ही आमच्या साठी म्हणजे कुमार निर्माणच्या टीम साठी काही प्रश्न, सूचना असल्यास नक्की टाका मग आपण यावर आम्ही आल्यावर चर्चा करूया.

- कुमार निर्माण टीम


No comments:

Post a Comment