Saturday, 31 December 2016

डोकं चालवा


बचनराम यांच्या दुकानात एक दाढीवाले गिऱ्हाईक आले. दाढीवाल्याने दुकानातून १३ रुपयांचा माल खरेदी केला २० रु. ची नोट दिली. बचनराम यांच्याकडे सुटे पैसे  नव्हते.
समोरच शपथराम यांचे दुकान होते. बचनराम शपथराम यांच्याकडे गेले. त्यांनी दाढीवाल्याने दिलेली २० रु. ची नोट शपथरामांना दिली. शपथरामांनी त्यांना २० सुटे रुपये दिले.
बचनरामांनी दाढीवाल्याला ७ रु. परत दिले. दाढीवाला निघून गेला.
थोड्या वेळाने शपथराम २० रु. ची नोट घेऊन बचनरामकडे आले.
‘अहो बचनरामशेट तुम्ही दिलेली २० रु. नोट हीच ना ?’
‘हो’
‘मग ही परत घ्या. ही नोट खोटी आहे.’
बचनरामनी नोट पहिली. दाढीवाल्याने दिलेली नोट खोटी होती. बचनरामांनी मुकाट्याने गल्ल्यातून दहा-दहा रुपयांच्या दोन नोटा काढून शपथरामांना दिल्या.
तर या व्यवहारात बचनराम यांचे एकूण किती रुपये नुकसान झाले?
४० रु. २० रु. २७ रु. ३३ रु. ७ रु. ?
(माल विक्रीमुळे होणारा फायदा विचारात घेऊ नये.)
या कोड्याचे उत्तर  सविस्तर लिहून आम्हाला पाठवा


No comments:

Post a Comment