सप्रेम नमस्कार!
शालेय
वयोगटातील मुलांमध्ये सामाजिक बुद्धिमत्तेचा विकास व वैश्विक मानवी मुल्यांची
रुजवणूक करणे असे उद्दिष्ट असलेल्या 'कुमार निर्माण' या शैक्षणिक उपक्रमाने
नुकतेच तिसऱ्या वर्षात मोठ्या दिमाखात पदार्पण केले आहे. कुठलीही मोठी जाहिरात न करता २० जिल्ह्यांतून ५० गट यावर्षी कुमार निर्माण
अंतर्गत कार्यरत असतील याबद्दल आपणा सर्वांचे अभिनंदन!
आपण हे
नियतकालिक, कुमार निर्माण संबंधी विविध घडामोडी, विद्यार्थ्यांचे व निमंत्रकांचे
अनुभव, शैक्षणिक साहित्य यांची देवाण घेवाण करण्यासाठी सुरु करत आहोत. याची सर्व
विद्यार्थी, पालक व निमंत्रकांना मदत होईल अशी आशा वाटते.
नुकतीच
निमंत्रकांची प्रशिक्षण कार्यशाळा पार पडली. निर्माण युवा सायली तामणे, सनत गानू,
धनंजय माळी व केदार आडकर यांनी काही सत्रे घेतली. नंदाकाकानी (नंदा
खरे) देखील या कार्यशाळेत उपस्थित राहून सर्वांना प्रोत्साहन दिले. तर निर्माण ६
चे सम्मीत वर्तक, अमोल दळवी, निरंजन
तोरडमल, इशा घुगरी, गीता लेले, गणेश माळी, शैलेश जाधव यांनी हे प्रशिक्षण शिबीर पार पाडण्यात खूप मोलाची मदत केली.
या प्रशिक्षणातून देण्यात आलेले काही महत्वाचे विचार असे
होते -
·
‘विद्यार्थी आपल्या ज्ञानाची निर्मिती स्वतः करत असतो’
·
‘आयुष्य हेच शिक्षण आहे’
·
‘कृतींमधून मुलांच्या वृत्तीमध्ये होणारा सकारात्मक बदल महत्वाचा आहे’
·
‘कुमार निर्माण अंतर्गत मुलांच्या विविध कृती या फक्त माध्यम आहेत, साध्य नव्हे’
या कार्यशाळेत
शेवटच्या दिवशी, आधीपासून
कुमार निर्माणशी जोडल्या गेलेल्या मुलांचा कौतुकसोहळा मा. डॉ. अभय बंग व मा. विवेक
सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. त्यांच्याकडून
मिळणारे मार्गदर्शन ही नेहमीप्रमाणेच एक मेजवानी होती.
शैलेश जाधव व
प्रणाली सिसोदिया लवकरच प्रफुल्ल सोबत कुमार निर्माण साठी पूर्णवेळ काम सुरु
करतील. त्यांना आपल्या सर्वांतर्फे खूप खूप शुभेच्छा!
कुमार निर्माण चा गेल्या वर्षभराचा आढावा घेण्यासाठी खालील व्हिडीओ पहा.
No comments:
Post a Comment