Tuesday 26 June 2018

कुमार गीत

कुमार गीत
तनमनाच्या मंदिरी या जागवूया चेतना
अर्थ लाभो जीवनाला हीच आमुची प्रार्थना II धृ II

चेतना माझ्यातही, याच्यातही, त्याच्यातही
पृथ्वी-जल-आकाश अन वायुतही, तेजातही
विश्वव्यापी या स्वरूपा नित्य माझी वंदना II II
एक आहे मागणे, हातात या सामर्थ्य येवो
भिक-लाचारी-दयेचा स्पर्श ना आम्हांस होवो
कष्ट करू आयुष्य फुलवू मंत्र जप रे तू मना II II
घेतले व्रत आज आम्ही स्वप्न ते सत्यात येवो
दीन-दुर्बल-वंचितांचा विसर ना आम्हास होवो
या जगी आनंद नांदो ही मनाची कामना II II

तनमनाच्या मंदिरी या जागवूया चेतना
अर्थ लाभो जीवनाला हीच आमुची प्रार्थना II धृ II
गीत – पवन खेबुडकर
संगीत – अशोक पत्की
स्वर – शौनक अभिषेकी
चित्रपट – आम्ही असू लाडके
वरील लिंक वर जाऊन तुम्ही या गाण्याचा विडीयो बघू शकता किंवा खालील QR कोड स्कॅन करा


No comments:

Post a Comment