Wednesday 1 March 2017

कोडे

कोसल देशाची राजकन्या स्मितवदना ही जन्मतः आंधळी होती. आपल्या राजकन्येला दृष्टी यावी यासाठी राजाने अनेक प्रयत्न केले पण यश काही मिळालं नाही.
एकदा एक जटाधारी वृध्द राजवाड्यात आला असता त्याने सांगितले. “राजा, उन्नतग्रीव नावाच्या पर्वताजवळ एक गुहा आहे. त्या गुहेत एकवीस पाकळ्या असलेले व निसर्गतःच सुगंधित असलेले एक सुवर्णकमल आहे . त्या कमलपुष्पातील सुगंधित पाणी राजकन्येच्या डोळ्यात घातले तर तिला पुन्हा दृष्टीलाभ होईल.”
राजाने घोषित केले की जो कोणी ते सुवर्णकमल आणून राजकन्येला पुन्हा दृष्टी मिळवून देईल त्याला अर्धे राज्य देण्यात येईल.
सोमल देशाचा राजकुमार मात्र त्या जटाधारी वृद्धाला जाऊन भेटला आणि मार्ग विचारला. त्यांनी सांगितलं.
“तरूणा, उन्नतग्रीव पर्वतावरील एका गुहेत एक सोन्याची, एक चांदीची व एक तांब्याची अशा तीन पेट्या आहेत त्यातील एक पेटीत ते कमल आहे व उरलेल्या दोन पेट्यांत विषारी साप आहे. जो कोणी त्या दोन पेट्या उघडेल त्याचा मृत्यू अटळ आहे. पेट्या दगडात घट्ट बसवलेल्या आहेत. एक यक्ष या प्रत्येक पेटीवर एक-एक वाक्य लिहून ठेवतो. त्या तीन विधानांपैकी एकमात्र विधान सत्य असते. इतर दोन असत्य असतात आणि त्या विधानांमध्ये कमल कोणत्या पेटीत आहे याबद्दल माहिती असते. यावरून तुला पेटी निश्चित करावी लागेल.”







राजपुत्राला तिथे गेल्यावर पुढील तीन पेट्या दिसल्या. यातील कोणत्या पेटीत सुवर्णकमल आहे हे शोधायला राजपुत्राला मदत करा

No comments:

Post a Comment