Wednesday, 30 December 2015

पुरवणी

‘कुमार निर्माण Box- एक भन्नाट कल्पना !


काय मग मित्रांनो कसे आहात. आपल पहिल्या भरारी मधील कुमार गीत ‘प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा’ तुम्हाला आतापर्यंत पाठ झालं असेलच आणि तुम्ही ते आवडीने गात असाल. मग गाण्यात म्हटल्याप्रमाने तुम्ही प्रश्न विचारताय की नाही? तुम्हाला पडलेले प्रश्न तुम्ही नक्की निमंत्रकांना, पालकांना किंवा अगदी आम्हाला किंवा तुमच्या शिक्षकांना विचारत रहा. आम्हाला प्रश्न विचारण्यासाठी आमचे मोब. नं. या मासिकाच्या अनुक्रमणिकेत दिलेले आहे.

असंच मुलांना अजून प्रश्न पडावे आणि मुलांनी ते बिनधास्त विचारावे यासाठी आपल्याच एका पुण्यातील गटाने एक नवीनच भन्नाट आईडिया लढवली व ‘कुमार निर्माण बॉक्स’ चा जन्म झाला.

यात मुलांना पडलेले कोणतेही प्रश्न, समस्या, दिसलेली घटना, ज्या वरून आपल्याला राग आला अथवा एखादी गोष्ट आवडली किंवा काही कळले नाही अशा प्रकारचं सारं काही या box मध्ये मुलं टाकतात आणि मग एखाद्या बैठकीत हा box उघडून त्यातल्या प्रश्नांवर चर्चा करतात. सगळे मिळून या प्रश्नांवर काही उपाय शोधतात आणि मग हे प्रश्न कृती करून सोडवतात.

मग तुम्हीही असा एक box तुमच्या गटासाठी बनवा, त्यात भरपूर प्रश्न जमा करा. मग गटात त्यावर चर्चा करून उपाय शोधण्याचा प्रयत्न आपण करूया. याच बॉक्स मध्ये तुम्ही आमच्या साठी म्हणजे कुमार निर्माणच्या टीम साठी काही प्रश्न, सूचना असल्यास नक्की टाका मग आपण यावर आम्ही आल्यावर चर्चा करूया.

तर मग लवकरच भेटूया.. तुमच्या प्रश्नांसोबत !

No comments:

Post a Comment