Saturday, 31 October 2015

पुरवणी क्र.२

कृती – प्रत्येक विद्यार्थ्याने खालील माहिती गोळा करावी व सर्वांनी मिळून त्यावर गटामध्ये चर्चा करावी

1)     आपल्या आजूबाजूला अशी मुले किंवा कुटुंबे ज्यांनी यावर्षीची दिवाळी साजरी केली नाही किंवा कमी साजरी केली
2)     अशी मुले ज्यांनी नवीन कपडे घेतले नाही किंवा कमी घेतले किंवा महाग घेतले नाही
3)     अशी कुटुंबे जेथे घरी दिवाळीचा फराळ बनवण्यात आला नाही किंवा कमी बनवला
4)     अशी मुले / कुटुंबे ज्यांनी फटाके फोडले नाहीत किंवा कमी फोडले

गटातील प्रत्येकाने अशा मुलांचा, कुटुंबांचा शोध घेऊन, शक्यतो त्यांच्या घरी जाऊन व त्यांच्याशी गप्पा मारून वरील माहिती गोळा करावी.

उदा. हे करताना त्या कुटुंबाने दिवाळी का साजरी केली नाही यामागील कारण समजून घेण्याचा प्रयत्न करावा. नंतर गटात एकत्र येऊन सर्वांनी त्यावर चर्चा करावी.

No comments:

Post a Comment